नवी मुंबई: राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण असलेला विद्यार्थी स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्या प्रकरणानंतर राज्यातील वातावरण तापू लागलं आहे. ‘राज्यसेवा परीक्षा मायाजाल आहे, यात पडू नका’ असे उद्गार काढत स्वप्नीलने आपले जीवन संपवले. मात्र या आत्महत्येमुळे राज्यसेवा परीक्षेचे वास्तव समोर आले आहे.
याच पार्श्वभूमीवर स्वप्नील लोणकरला न्याय मिळावा यासाठी आज मनसेतर्फे धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. नवी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विधान भवन असा हा धडक मोर्चा मनसेतर्फे काढण्यात येत असून सरकारपर्यंत लाखो राज्यसेवा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना पोहोचवून जाब विचारण्यासाठी हा येणार असल्याची माहिती मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिली.