पोलिसांच्या कारवाईनंतर कामोठ्यातील रास्ता रोको आंदोलन मागे

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई सायन-पनवेल महामार्गावर कामोठे येथे उड्डाण पुलानजीकचा रस्ता गेली तीन वर्ष बंद असल्यामुळे संतप्त कामोठेकरांनी सायन-पनवेल मार्गवर रास्ता रोको केले.पक्षाचा भेदभेव विसरून सर्व पक्षीय लोक या आंदोलनात सहभागी झाले होते. तरी शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी या आंदोलनात अधिक पाहायला मिळाले. सायन-पनवेल महामार्गवर वाहतूक कोंडी होऊ नये व प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन […]

पोलिसांच्या कारवाईनंतर कामोठ्यातील रास्ता रोको आंदोलन मागे

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

सायन-पनवेल महामार्गावर कामोठे येथे उड्डाण पुलानजीकचा रस्ता गेली तीन वर्ष बंद असल्यामुळे संतप्त कामोठेकरांनी सायन-पनवेल मार्गवर रास्ता रोको केले.पक्षाचा भेदभेव विसरून सर्व पक्षीय लोक या आंदोलनात सहभागी झाले होते. तरी शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी या आंदोलनात अधिक पाहायला मिळाले.

सायन-पनवेल महामार्गवर वाहतूक कोंडी होऊ नये व प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करायला लागू नये म्हणून पोलिसांनी त्वरीत कारवाई करून आंदोलकांना हटविले.या आंदोलनात तब्बल पाचशेहून अधिक आंदोलकांनी सहभाग घेतला व आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

आंदोलनाची माहिती मिळताच, पोलीस हे आंदोलक  येण्यापूर्वीच  हजर झाले. आंदोलकांना  केवळ पाच मिनिटांचच आंदोलन करण्याची पोलिसांनी त्याना सूचना दिल्या.त्यानंतर अवघ्या दहा मिनिटामध्ये पोलिसांनी कामोठेकराचा रास्ता रोको आंदोलन संपविले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number