Navi Mumbai Crime : नवी मुंबईत ‘देवमाणूस’; वॉर्डबॉयच्या कृतीने 21 वर्षीय तरूणीला गमवावा लागला जीव, नेमकं काय घडलं?

वाशी मधील 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत ‘देवमाणूस’; वॉर्डबॉयच्या कृतीने 21 वर्षीय  तरूणीला  गमवावा लागला जीव, नेमकं काय घडलं?

मराठी मालिका ‘देवमाणूस’ ही सर्वांच्याच परिचयाची आहे. तशीच घटना आता नवी मुंबईतली वाशी येथे घडली आहे. डॉक्टर नसताना स्वतःला डॉक्टर म्हणून सादर करत उपचार करणाऱ्या एका वॉर्डबॉयच्या हलगर्जीपणामुळे वाशी मधील 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

दरम्याने समोर आलेल्या माहितीनुसार,  प्रचिती भुवड असे मृत तरुणीचे नाव असून या प्रकरणी आरोपी वॉर्डबॉय संदेश पाष्टे याला पोलिसांनी अटक केलं आहे. अंधेरी येथील सिद्धी नर्सिंग होममध्ये वॉर्डबॉय म्हणून कार्यरत असणारा आणि कोणतीही वैद्यकीय पदवी संदेश पाष्टे डॉक्टर म्हणून वावरत रुग्णांवर उपचार करत होता. 

प्रचिती भुवड हिला हार्मोनल आजार होता यावेळी ओळखीतून संदेश पाष्टे याला उपचारासाठी बोलावले असता आरोपीने तरुणीला दोन इंजेक्शन दिली. मात्र काही वेळातच तरुणीचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांना धक्का बसला. घटनेनंतर कुटुंबियांचा संशय बाळावल्याने वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. वाशी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपी पाष्टेला मानखुर्द येथून अटक केली असून प्रचितीच्या उपचारासाठी आरोपीने तब्बल 15 हजार रुपये घेतल्याचे देखिल निष्पन्न झाले आहे. या घटनेनंतर पोलीसांनी देखिल नागरिकांनी अधिकृत रुग्णालय आणि डॉक्टरांच्या माध्यमातूनच उपचार घेण्याचे आवाहन केलेय. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number