जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई
देशातील स्वच्छ शहरांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई टॉप टेनच्या यादीत आहे.
नवी मुंबई आठव्या स्थानावर असून पहिल्या स्थानावर इंदूर शहर आहे.
केंद्रीय शहर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार देशातील विविध शहरांची यादी आज जाहीर केली.
दरम्यान, गेल्यावर्षी स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणासाठी देशातल्या 73 शहरांचा समावेश करण्यात आला होता.
यामध्ये पहिल्या 10 शहरांत महाराष्ट्रातील नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांचा समावेश होता.