जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई
तरुणाकडून वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करून मारहाण कऱण्यात आल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडलीय.
रात्री ड्युटीवर असताना एका तरुणाने वाहतूक पोलिसाच्या कानशिलात लगावलीय.
तानाजी पाटील असं वाहतूक पोलिसाचे नाव असून कानशिलात लगावणाऱ्या तरुणाचे दानिश शेख असं नाव आहे. या मारहाणीचा संपूर्णाचा व्हिडिओ व्हायरलं झालाय. याप्रकरणी तरुणाची अटकेनंतर सुटका करण्यात आलीय.