जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई
जीवाची मजा करताय तर जरा जपून जय महाराष्ट्र सर्वांनाच हे आवाहन करत आहे.
कारण अतिउत्साहाच्या भरात अनेकदा दुर्घटना होतात. करायला जातो मजा पण आयुष्यभराची सजा मिळते.
बेलापूरमध्येही अशीच दुर्घटना घडली. अग्रोली तलावात बुडून अजय गायकवाड या तरुणाचा मृत्यू झाला.
आपल्या 4 ते 5 मित्रांसोबत पोहायला गेलेला अजय तलावात बुडाला. अजयने इतर मित्रांसारखीच तलावात उडी घेतली.
पण, त्यानंतर तो बाहेर आलाच नाही. मित्रांच्या डोळ्यादेखत अजय तलावात बुडाला. अजय बुडतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यातही कैद झाला.