नवी मुंबईतील बहुचर्चित स्वप्नील सोनावणे हत्या प्रकरणातील वकिलावर प्राणघातक हल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई   नवी मुंबईत वकील अमित कटारनवरेंवर प्राणघातक हल्ला झालाय. कटारनवरे हे स्वप्नील सोनावणे हत्याकांडील मुख्य वकील आहे. 4 ते 5 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केलाय. धारदार शस्त्रानं वकील कटारनवरेंच्या डोक्यात आणि पायावर वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झालेत. दरम्यान वकील अमित कटारनवरेंवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नवी मुंबईत प्रेमप्रकरणातून स्वप्निल […]

नवी मुंबईतील बहुचर्चित स्वप्नील सोनावणे हत्या प्रकरणातील वकिलावर प्राणघातक हल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

नवी मुंबईत वकील अमित कटारनवरेंवर प्राणघातक हल्ला झालाय. कटारनवरे हे स्वप्नील सोनावणे हत्याकांडील मुख्य वकील आहे. 4 ते 5 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केलाय.

धारदार शस्त्रानं वकील कटारनवरेंच्या डोक्यात आणि पायावर वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झालेत. दरम्यान वकील अमित कटारनवरेंवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नवी मुंबईत प्रेमप्रकरणातून स्वप्निल सोनावणे या 15 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली होती. नेरुळच्या सेक्टर 13 मध्ये ही घटना घडली होती.

मुलगा आणि मुलगी पहिलीपासून एकाच वर्गात होते. त्यामुळे दोघांची मैत्री होती. मात्र मुलीच्या घरच्यांना ही मैत्री मान्य नसल्याने कुटुंबीयांनी स्वप्निलला घरी बोलवून घेतलं आणि जबर मारहाण केली.

यानंतर उपचारासाठी स्वप्निलला डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number