खारघर, २९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : खारघर वसाहतीमधील उद्याने जीवघेणी ठरत आहेत. सुरक्षा रक्षकाची नोकरी करणाऱ्या प्रकाश विश्वकर्मा याच्या चार वर्षीय चिमुरडीचा एका दुर्घटनेत मृत्यू झाला. उद्यानात खेळण्यासाठी गेलेल्या एका चार वर्षांच्या बालिकेला उद्यानातील बाकाच्या दूरवस्थेमुळे प्राण गमवावे लागले.
प्रकाश त्याची मुलगी ब्रिजा हिच्यासोबत उद्यानात गेला होता. ब्रिजा उद्यानात खेळत होती आणि प्रकाश थोड्या अंतरावर बसला होता. खेळत असताना ब्रिजा उद्यानातील एका दगडी बाकावर बसण्यासाठी गेली. पण दगडी बाक अचानक ब्रिजाच्या अंगावर पडला. बाकाच्या वजनामुळे ब्रिजाचा मृत्यू झाला. प्रकाशला डोळ्यासमोर मुलीचा मृत्यू बघावा लागला.