Nowgam Blast Update : श्रीनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये स्फोट का झाला? गृहमंत्रालयाचं स्पष्टीकरण, नेमकं कारण समोर

स्फोटात मृत झालेल्यांमध्ये State Investigation Agency (SIA) चा एक कर्मचारी, Forensic Science Laboratory (FSL) चे तीन सदस्य, दोन क्राइम सीन फोटोग्राफर, दोन महसूल अधिकारी यांचा समावेश आहे.

Nowgam Blast Update : श्रीनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये स्फोट का झाला? गृहमंत्रालयाचं स्पष्टीकरण, नेमकं कारण समोर

श्रीनगरच्या नौगाम पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी उशिरा रात्री झालेल्या मोठ्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला. फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचे नमुने तपासताना अचानक हा स्फोट झाला. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून 27 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. रात्री उशिरा झालेल्या या दुर्घटनेनंतर पोलिस स्टेशन आणि आसपासची अनेक वाहने काही क्षणांत जळून खाक झाली.

घटनेनंतर जम्मू काश्मीरचे Director General of Police (DGP) नलिन प्रभात आणि वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसर पूर्णपणे बंद करून तपास सुरू केला. दरम्यान Union Ministry of Home Affairs (MHA) ने पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले की हा स्फोट दहशतवादी हल्ला नव्हता, तर फॉरेन्सिक तपासणीदरम्यान घडलेला अपघात होता. मंत्रालयाने सांगितले की फरीदाबादमधून मिळालेली मोठी स्फोटक सामग्री नौगाम पोलिस स्टेशनमध्ये ठेवण्यात आली होती आणि नमुने गोळा करत असताना स्फोट झाला.

हेही वाचा: Sambhajinagar Crime : संभाजीनगर हादरलं! नळकांडी पुलाजवळ भाजप नेत्याची डेड बॉडी सापडली, घातपाताचा संशय; कारण…

जम्मू काश्मीरचे DGP नलिन प्रभात यांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी फरीदाबादमधून मोठ्या प्रमाणात स्फोटके, रसायने आणि रीजेंट जप्त करण्यात आले होते. ही सर्व सामग्री पोलिस स्टेशनच्या खुल्या परिसरात सुरक्षितरीत्या ठेवली होती. नमुने गोळा करून ते Forensic Science Laboratory (FSL) कडे पाठवण्याची प्रक्रिया मागील दोन दिवसांपासून सुरू होती. DGP म्हणाले की, रात्री 11.20 वाजता नमुन्यांची तपासणी चालू असतानाच अचानक स्फोट झाला. या स्फोटात मृत झालेल्यांमध्ये State Investigation Agency (SIA) चा एक कर्मचारी, Forensic Science Laboratory (FSL) चे तीन सदस्य, दोन क्राइम सीन फोटोग्राफर, दोन महसूल अधिकारी आणि एक सहाय्यक यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक पोलिस कर्मचारी आणि स्थानिक नागरिक जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की पोलिस स्टेशनची इमारत गंभीररीत्या उद्ध्वस्त झाली आणि जवळील इमारतींनाही मोठे नुकसान झाले. नुकसानीचे अचूक मूल्यांकन सुरू आहे आणि स्फोटाची नेमकी कारणे शोधण्यासाठी स्वतंत्र चौकशी केली जात आहे. DGP नलिन प्रभात म्हणाले की, “या दुर्दैवी घटनेने आम्ही अत्यंत दुःखी आहोत. जम्मू काश्मीर पोलिस हे मृतांच्या कुटुंबियांसोबत खंबीरपणे उभे आहेत.”

हेही वाचा: Nowgam Blast : श्रीनगरमध्ये नौगाम पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट; नऊ जणांचा मृत्यू, 29 जखमी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number