पुण्यातील नसरापूर अत्याचारप्रकरणावरून राज्यासह देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिला दगडाने ठेचून तिचा मृतदेह शेणाखाली पुरला. यामुळे गावात एकच असंतोष निर्माण झाला. त्यानंतर आरोपीला फाशी व्हावी अशी तीव्र मागणी सर्वच स्तरातून होऊ लागली. अशातच आता चिमुरडीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. या अहवालातून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मात्र, आता या प्रकरणात ससून रुग्णालयाचा जो प्राथमिक शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे, तो अंगावर काटा आणणारा आहे. नराधम आरोपीने या चिमुरडीचा जीव घेताना क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्याचे समोर आले आहे. नसरापूर येथील या चिमुरडीवर अत्याचार केल्यानंतर तिचा खून करण्यात आला. मात्र, हा खून करण्यापूर्वी आरोपीने तिची ओरड कोणाला ऐकू जाऊ नये, यासाठी तिच्या तोंडात पाय मोजा (Socks) कोंबल्याची धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. इतकेच नाही तर, या चिमुरडीच्या छातीवरही ओरखड्यांचे आणि जखमांचे वळ उमटल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. ससून रुग्णालय प्रशासनाने हा प्राथमिक अहवाल आता पोलिसांच्या स्वाधीन केला आहे