Ashok Kharat Case: कानाजवळ पुटपुटायचा, पेढा, गायत्री मंत्र म्हणायला लावायचा आणि…; कॅप्टन खरातच्या लैंगिक शोषणाचा ‘हा’ होता पॅटर्न

कॅप्टन अशोक खरात प्रकरणात पोलिसांना लैंगिक शोषणाचे 58 नाहीतर 100 पेक्षा अधिक व्हिडीओ असल्याची धक्कादायक माहिती नाशिकमध्ये पार पडलेल्या SIT च्या बैठकीतील पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Ashok Kharat Case: कानाजवळ पुटपुटायचा, पेढा, गायत्री मंत्र म्हणायला लावायचा आणि…; कॅप्टन खरातच्या लैंगिक शोषणाचा ‘हा’ होता पॅटर्न

राज्यात सध्या स्वयंघोषित बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. धर्माच्या नावाखाली महिलांशी अश्लील कृत्ये केल्याचा खरातचे अनेक व्हिडिओ समोर आले असून आरोपी कॅप्टन अशोक खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान पोलिसांना सुमारे 58 अश्लील आणि अघोरी कृत्यांचे व्हिडिओ मिळाल्याची माहिती होती. मात्र त्याच्या लैंगिक शोषणाचे 58 नाहीतर 100 पेक्षा अधिक व्हिडीओ असल्याची धक्कादायक माहिती नाशिकमध्ये पार पडलेल्या SIT च्या बैठकीतील पोलीस सूत्रांनी दिली आहे. नाशकात IPS तेजस्विनी सातपुतेंच्या उपस्थित ही बैठक पार पडली असून SIT च्या पथकात नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील 12 वरीष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. 

हेही वाचा- Anjali Damania : अंजली दमानियांनी भर पत्रकार परिषदेत ऐकवली रुपाली चाकणकरांची कथित ऑडिओ क्लिप; खरातवर केले गंभीर आरोप
यावेळी एका व्हिडीओमध्ये खरातने महिलेच्या डोक्यावर तांब्या-लोटा ठेऊन तिच्या कानाजवळ 'मी कृष्णाचा अवतार, तू मागच्या जन्मातील माझी राधा' असं पुटपुटाल्याचे संबंधीत व्हिडीओमधील महिलेने स्पष्ट केलं आहे. तसेच महिलांना गायत्री मंत्र म्हणायला लावायचा आणि लागलीच स्पर्श करायला सुरुवात करायचा. महिलेसोबत आलेल्या व्यक्तींना ध्यानस्थ पूजेच्या नावाखाली कॅबिन बाहेर ठेवायचा. महिलांना गुंगी आली की त्यांचं लैंगिक शोषण सुरू करायचा. त्यापूर्वी पेढा आणि कवडवट खारट चव असलेलं पाणी प्यायला द्यायचा. कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा हा पॅटर्न होता. कॅप्टन खरातकडे अनेक राजकीय, कलाकार, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळींचा राबता असायचा.      

हेही वाचा- Sushma Andhare on Rupali Chakankar : 'रुपाली चाकणकरांनी स्वत:ची अनामिका कापली आणि…', 'ते' भयंकर फोटो दाखवत सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट                  
खरातच्या झाडाझडतीत 2 लॅपटॉप, 8 लाखांची रोकड, पिस्तुल, जीवंत काडतुसे आणि मालमत्तांची कागदपत्रे मिळाली आहे. तसेच 100 हुन अधिक लैंगिक शोषणाचे सीसीटीव्ही फुटेज असल्याची माहिती आहे. शिर्डी प्रकरणातील आरोपी नीरज जाधवने या व्हिडीओ काढल्याचा संशय व्यक्त केला जातोय. तसेच व्हिडीओतुन तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचं समोर आलं आहे. सध्या लैंगिक शोषणाच्या आरोपात कॅप्टन खरात नाशिक पोलिसांच्या अटकेत असून कॅप्टन खरात प्रकरणात दाखल 3 गुन्ह्यांचा वेगाने तपास सुरू आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number