नाशिकमधील वणी गडावर खासगी वाहनांना बंदी

नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील वणीच्या सप्तश्रृंगी गडावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी गडावर खासगी वाहनांना बंदी घालण्यात आहे

नाशिकमधील वणी गडावर खासगी वाहनांना बंदी

नाशिक : नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील वणीच्या सप्तश्रृंगी गडावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी गडावर खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या बंदीमुळे खासगी वाहनांमधून येणाऱ्या भाविकांची पंचाईत झाली आहे. वाहनातून उतरल्यानंतर चालकाला सूचना देऊन वाहन गडाच्या पायथ्याशी पाठवावे लागत आहे. यामुळे परतीच्यावेळी भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून बसची व्यवस्थित सेवा मिळत नाही. खासगी वाहनांवर बंधने घातली आहेत. यामुळे भाविक त्रस्त झाले आहेत. काही भाविकांनी पोलिसांशी वाद घातल्यामुळे काही काळ गडाच्या परिसरात वातावरण तापले होते. समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number