नाशिक ते पंढरपूर सायकल वारी

नाशिकमधून पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी सायकलवारी निघणार आहे. आषाढी एकादशीसाठी ही सायकलवारी काढण्यात येणार आहे.

नाशिक ते पंढरपूर सायकल वारी

नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रातील वारकऱ्यांची पाऊले आषाढी एकादशीसाठी पंढरपूरच्या दिशेने चालली आहेत. नाशिकमधून पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी सायकलवारी निघणार आहे. आषाढी एकादशीसाठी ही सायकलवारी काढण्यात येणार आहे. नाशिकमधील सायकल लिस्ट फाउंडेशनचा हा अनोखा उपक्रम आहे. गेल्या १३ वर्षांपासून नाशिक ते पंढरपूर सायकलवारी चालु आहे.  ढोल ताशांच्या गजरात शुक्रवारी सायकल वारी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. पंढरपूर येथे सायकल गोल रिंगण करणार आहेत. शुक्रवारी नाशिकमधून निघाल्यानंतर शनिवारी संध्याकाळी ही सायकलवारी पंढपुरात पोहोचणार आहे. नाशिकमधून निघणाऱ्या या सायकलवारीतून पर्यावरण वाचवा, अमली पदार्थ मुक्त देश असे सामाजिक संदेश दिला जाणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number