चाळीसगावात ‘भूताची तलवार’, केवळ दर्शनाने भूतबाधा दूर

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव चाळीसगाव येथील पीर मुसा कादरी बाबा दर्ग्यावर बांधून ठेवल्यास व्याधी दूर होतात तलवार दर्शनाने भूतबाधा, कर्णी , कवटाळ, केलेली रुग्ण चांगली होतात म्हणून या ठिकाणी लाखो भाविक तलवार दर्शनासाठी येतात. यावर्षी भाविकाचा आकडा लाखांवर असल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीला हा दर्गा एक आव्हान म्हणता येईल. ढोल ताशांचा गजर होताचं नाचणारे आणि उड्या […]

चाळीसगावात ‘भूताची तलवार’, केवळ दर्शनाने भूतबाधा दूर

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

चाळीसगाव येथील पीर मुसा कादरी बाबा दर्ग्यावर बांधून ठेवल्यास व्याधी दूर होतात तलवार दर्शनाने भूतबाधा, कर्णी , कवटाळ, केलेली रुग्ण चांगली होतात म्हणून या ठिकाणी लाखो भाविक तलवार दर्शनासाठी येतात. यावर्षी भाविकाचा आकडा लाखांवर असल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीला हा दर्गा एक आव्हान म्हणता येईल. ढोल ताशांचा गजर होताचं नाचणारे आणि उड्या मारणारे हे रुग्ण नाहीत. तर त्यांना भूतबाधा झाल्याचं सांगितले जाते. नदीच्या घाणेरड्या पाण्यात लोळणे, कडक जागेवर उड्या मारणे असे प्रकार केल्याने यांना काहीही होत नाही असं इथे येणाऱ्या भैविकाना वाटते.

भूत काढण्यासाठी लहान मुलांना देखील याठिकाणी बांधून ठेवतात. पण त्याला भूतबाधा झालीय असं त्यांच्या कुटुंबाकडून सांगिततलं जातयं. म्हणून खेळण्या बागडण्याच्या वयात त्याला बांधून ठेवण्याची ही वेळ आलीय. मात्र, अंनिसन आवाज उठवल्यावर त्यांना सोडून देण्यात आले. अनेक रुग्ण जे डॉक्टरांच्या उपचाराने बरे होत नाहीत त्यांना येथे बांधून ठेवतात. भाविकांच्या नजरेतून हा पाहिला तर श्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टीकोनानुसार याला अंधश्रद्धा म्हणता येईल. मानसिक रुग्णांना भयंकर शारीरिक यातना केल्या जातात. यांच्यावर योग्यवेळी उपचार होणे गरजेचे आहे. तसच, या ठिकाणी मानसउपचार केंद्र उभारून यांच्यावर इथेचं उपचार केले पाहिजेत, भाविकांच्या दृष्टीने हे पीर मुसा कादरी त्यांचं श्रद्धा स्थान आहे. भाविकांनी मनोभावे पूजा केली आणि दर्शन घेतले तर त्यांना त्याचा फायदा होतो अशी भाविकांची भावना आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number