जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
नाशकात एका खाजगी स्कूल व्हॅन चालकाने दोन अल्पवयीन विद्यर्थीनींना अश्लिल व्हिडीओ दाखवून लैंगिक शोषण केल्याची घटना घडलीय. ह्या घटनेने नाशिक मधील पालकांमध्ये खळबळ उडालीय. नाशिकच्या सिडको भागातील एका शाळेत सातवी आणि दहावीच्या विद्यार्थीनींसोबत ही घटना घडलीय. व्हॅन चालक किशोर देवकर ह्याने अश्लील व्हिडिओ या मुलींना दाखवून लैंगिक शोषण केल्याचे तक्रारीत म्हटलंय.
गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. मुलींनी याबाबत घरी सांगितल्यानंतर व्हॅन चालका विरोधात नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संशयित आरोप किशोर देवकर याला अटक करण्यात आलीय. त्याच्या विरोधात लहान मुलांच्या लैगिक अत्याचार पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.