Nashik News : प्रवाशांनो, ही बातमी महत्त्वाची! नाशिकरोड बसस्थानक 3 महिने बंद; बससेवा कुठून आणि कोणत्या मार्गाने?

नाशिकरोड बसस्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहेत. हे बसस्थानक आजपासून तब्बल तीन महिने बंद राहणार आहे. जाणून घ्या सविस्तर

Nashik News : प्रवाशांनो, ही बातमी महत्त्वाची! नाशिकरोड बसस्थानक 3 महिने बंद; बससेवा कुठून आणि कोणत्या मार्गाने?

नाशिक : नाशिकरोड बसस्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहेत.  हे बसस्थानक आजपासून तब्बल तीन महिने बंद राहणार आहे. या दिवसात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाकडून पर्यायी वाहतूक व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. चला तर मग जाणून घेऊयात, नाशिकरोड बसस्थानक कधीपर्यंत बंद राहणार आहे आणि प्रवाशांसाठी प्रशासनाने कशा प्रकारची पर्यायी वाहतूक व्यवस्था केली आहे, याबाबत सविस्तर माहिती.

बसस्थानक का अन् किती दिवस बंद?
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकरोड या बसस्थानकात काँक्रिटीकरणाचे काम सुरु करण्यात येणार आहे. या कामामुळे आजपासून अर्थात 21 सप्टेंबरपासून ते थेट 20 डिसेंबर पर्यंत हे बस स्थानक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, बस स्थानक बंद असलेल्या तीन महिन्याच्या कालावधीत प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणजे प्रशासनाकडून पर्यायी वाहतूक व्यवस्था देखील केली आहे.

हेही वाचा-Hingoli News : कागदोपत्री सगळं योग्य… पण प्रत्यक्षात घडलं भयंकर; शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत, नेमकं काय घडलं?

नाशिकरोड बससेवेचे नवे ठिकाण
नाशिकरोड बसस्थानक बंद असल्याने सिटीलींक बससेवेच्या काही मार्गांमध्ये आणि थांब्यांमध्येही बदल करण्यात आलेला आहेत. नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर या मार्गावर धावणाऱ्या सिटीलींक बस आता नाशिकरोड बसस्थानकाऐवजी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरुन सुटणार आहे, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना रेल्वे स्टेशनवरूनच बसने प्रवास करता येणार आहे.

हेही वाचा-Ganpati Special Trains : कोकणकरांसाठी रेल्वेची खास भेट! पुन्हा धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या कुठे-कुठे थांबा

रात्रीच्या रेल्वे प्रवाशांसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. मुख्य म्हणजे, पंचवटी एक्स्प्रेसने रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी नाशिकरोडला उतरणाऱ्या प्रवाशांसाठी आता एकाच वेळी पाच बसेस उपलब्ध करुन दिल्या आहेत, त्यामुळे रेल्वेने नाशिकरोडल येणाऱ्या प्रवशांना शहराच्या अनेक भागात जाण्यासाठी अतिरिक्त बससेवेचा पर्याय उपलब्ध मिळणार आहे.

प्रवाशांसाठी पर्यायी बसमार्ग
याशिवाय तपोवन ते सिन्नर या मार्गावरील सिटीलींक बससेवेच्या मार्गातही बदल केला जाणार आहे. या मार्गावरील बससेवा ही सिन्नर फाटा, उड्डाणपूल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिटको चौक या पर्यायी मार्गाने चालवण्यात येणार आहे. बसस्थानकातील काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांना ठरवून दिलेल्या पर्यायी ठिकाणांहून बससेवा उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी बदललेल्या बस मार्गांची आणि थांब्यांची माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तीन महिन्यांच्या कामानंतर बसस्थानक पुन्हा सुरू झाल्यानंतर नियमित बससेवा पूर्ववत होणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number