…म्हणून या रहिवाशांनी घराबाहेर ठेवलयं लाल रंगाचं पाणी

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. अशातच या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला कंटाळून इथल्या नागरिकांनी घराबाहेर बाटलीत लाल रंगाचं पाणी ठेवलंय. हे पाणी बघितल्यानंतर कुत्रे याठिकाणी येत नसल्याचं नागरिकांचं म्हणणंय. दरम्यान, इथल्या सिडको भागात अनेक नागरिकांच्या घरासमोर लाल रंगाच्या पाण्याने भरलेल्या बाटल्या पहायला […]

…म्हणून या रहिवाशांनी घराबाहेर ठेवलयं लाल रंगाचं पाणी

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. अशातच या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला कंटाळून इथल्या नागरिकांनी घराबाहेर बाटलीत लाल रंगाचं पाणी ठेवलंय. हे पाणी बघितल्यानंतर कुत्रे याठिकाणी येत नसल्याचं नागरिकांचं म्हणणंय.

दरम्यान, इथल्या सिडको भागात अनेक नागरिकांच्या घरासमोर लाल रंगाच्या पाण्याने भरलेल्या बाटल्या पहायला मिळतात. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेकदा पालिका प्रशासनाकडे मागणीही या नागरिकांनी केली. मात्र, पालिकेच्या दुर्लक्षीपणामुळे नागरिकांना अशा प्रकारच्या लाल रंगाच्या पाण्याचा आधार घेण्याची वेळ ओढावली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number