त्याला राग अनावर झाला अन् थेट पोलीस चौकी फोडण्याचा प्रयत्न केला

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   घरातील पैसे चोरीला गेल्याचा राग आल्यानं एका इसमाने थेट पोलीस चौकी फोडण्याचा प्रयत्न केला. नाशिकच्या दूध बाजार परिसरात हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. समाधान कुमावत असं या तोडफोड करणाऱ्या व्यक्तीच नाव आहे.  कुमावत यांच्या घरी चोरी झाली. याबाबतची तक्रार देण्यासाठी कुमावत नाशिकच्या दूध बाजार पोलीस चौकीत आला. मात्र, चौकी […]

त्याला राग अनावर झाला अन् थेट पोलीस चौकी फोडण्याचा प्रयत्न केला

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

घरातील पैसे चोरीला गेल्याचा राग आल्यानं एका इसमाने थेट पोलीस चौकी फोडण्याचा प्रयत्न केला. नाशिकच्या दूध बाजार परिसरात हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

समाधान कुमावत असं या तोडफोड करणाऱ्या व्यक्तीच नाव आहे.  कुमावत यांच्या घरी चोरी झाली. याबाबतची तक्रार देण्यासाठी कुमावत नाशिकच्या दूध बाजार पोलीस चौकीत आला.

मात्र, चौकी बंद असल्याचं बघून त्याच्या रागाला पारावार उरला नाही आणि त्याने थेट बंद असलेल्या पोलीस चौकीवर लाथा मारायला सुरुवात केली.

एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने जवळ पडलेला दगड उचलून चौकीच दार तोडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडत असताना परिसरातील लोक देखील घाबरले मात्र एवढ्यात पोलिसांनी येऊन त्याला ताब्यात घेतलं. पोलीस कुमावत याची चौकशी करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number