जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
मेट्रोमोनिअल वेबसाईटच्या माध्यमातून तरुणीची फसवणूक करणाऱ्याला अटक करण्यात आली. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची आर्थिक फसवणूक या नायजेरियन
तरुणाने केली होती.
नाशिक पोलिसांनी या नायजेरियन तरुणाला अटक केली आहे. या तरुणाने देशातील आणखी काही तरुणींची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत. त्यामुळे
अशा प्रकारे काम करणारं एक मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.
किंग्सले चिबुले असे या नायजेरियन व्यक्तीचे नाव आहे. तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लंडनवरून तुझ्यासाठी गिफ्ट पाठवल्याचे याने तरुणीला सांगितले.
यासाठी स्वत:च्या बँक खात्यात 1 लाख 37 हजार जमा करण्यास सांगितले. यानंतर तरुणीनं पैसे जमा केल्यानंतर हा तरुण फरार झाला आणि आपली फसवणूक
झाल्याचे लक्षात येताचं तिनं पोलीस ठाणे गाठले दरम्यान नाशिक पोलिसांनी या तरुणाला अटक केली.