Nashik News : नाशिकमध्ये वाहतूकीच्या नियमात मोठे बदल, 31 मे पर्यंत ‘या’ वाहनांना प्रवेश करण्यास बंदी

त्यामुळे आता हा मार्ग 31 मे 2026 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. 

Nashik News : नाशिकमध्ये वाहतूकीच्या नियमात मोठे बदल, 31 मे पर्यंत ‘या’ वाहनांना प्रवेश करण्यास बंदी

महाराष्ट्रातील नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता मोठी अपडेट समोर येत आहे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.त्याबद्दल आता सविस्तरपणे जाणून घेऊया. 

यावेळी नाशिक शहरातील वाहतूकीसंदर्भात मोठे बदल करण्यात आले आहेत. नेक रस्त्यांवर दुरुस्ती, रुंदीकरण आणि विकासाची कामे सुरू असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खासगी बस तसेच जड आणि अवजड वाहनांच्या प्रवेशावरील बंदी आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता हा मार्ग 31 मे 2026 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. 

हेही वाचा – Mumbai Coastal Road : प्रसिध्द कोस्टल रोडमुळे स्थानिक रहिवाशांची शांतता भंग; सतत वाजणारं ए.आर.रहमानचं गाणंही होणार बंद, नेमकं काय घडलं? 

समोर आलेल्या माहितीनुसार, या मार्गावर सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत खासगी बस आणि जड वाहनांना नाशिक शहरात प्रवेश करण्यास मनाई असेल. मात्र सकाळी 8 वाजण्यापूर्वी आवश्यक वाहने शहरातून बाहेर जाऊ शकतील.त्याचप्रमाणे  कार आणि दुचाकींसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले असून वाहतूक पोलिसांकडून नियमित नियंत्रण ठेवले जात आहे. 

हेही वाचा – Apple Foldable Iphone: ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन; नाव, आणि किंमतही आली समोर, वाचून तुम्हालाही बसेल धक्का 

त्यामुळे आता शहरात सध्या 29 रस्त्यांची दुरुस्ती आणि रुंदीकरणाची कामे सुरू आहेत तसेच पाच उड्डाणपुलांच्या कामांमुळे वाहतुकीचे मार्ग बदलले आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number