व्हेंटिलेटरमध्ये आढळले जिवंत झुरळ, 45 वर्षीय महिलेचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिक मेडीकल कॉलेजच्या व्हेंटिलेटरमध्ये जिवंत झुरळ आढळून आले आहे. नाशिकच्या आडगाव मेडीकल कॉलेजात ही घटना घडलीय. या संपूर्ण घटनेमुळे आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे व्हेंटिलेटरवर असलेल्या 45 वर्षीय महिलेचा यात मृत्यू झाला आहे. दरम्यान व्हेंटिलेटरमध्ये आढळून आलेल्या जिवंत झुरळामुळे आमच्या रुग्णाचा मृत्यू झाला, असे […]

व्हेंटिलेटरमध्ये आढळले जिवंत झुरळ, 45 वर्षीय महिलेचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिक मेडीकल कॉलेजच्या व्हेंटिलेटरमध्ये जिवंत झुरळ आढळून आले आहे. नाशिकच्या आडगाव मेडीकल कॉलेजात ही घटना घडलीय. या संपूर्ण घटनेमुळे आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे व्हेंटिलेटरवर असलेल्या 45 वर्षीय महिलेचा यात मृत्यू झाला आहे.

दरम्यान व्हेंटिलेटरमध्ये आढळून आलेल्या जिवंत झुरळामुळे आमच्या रुग्णाचा मृत्यू झाला, असे मृत महिलेच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. तर मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी कॉलेज प्रशासनाविरुध्द कारवाई करण्याची मागणीदेखील केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number