Nashik Crime News: नाशिकमध्ये नववधूच्या गूढ मृत्यूसंदर्भात नवा तपास; सासरी सापडलेल्या बिब्बा नागाच्या खिळ्यामुळे वाढला सस्पेन्स

एका नोटमध्ये कुटुंबातील तणाव आणि भावनिक ताणतणावांबद्दल अनेक उल्लेख आढळले असून पोलिस तपास अतिरिक्त दिशांनी पुढे जात आहे.

Nashik Crime News: नाशिकमध्ये नववधूच्या गूढ मृत्यूसंदर्भात नवा तपास; सासरी सापडलेल्या बिब्बा नागाच्या खिळ्यामुळे वाढला सस्पेन्स

नाशिकच्या पंचवटीतील हिरावाडी परिसरात राहणाऱ्या नेहा संतोष पवार हिने 27 नोव्हेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. सासरच्या सातत्याने होणाऱ्या छळाला कंटाळून तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूपूर्वी नेहाने सात पानांची सुसाईड नोट आपल्या भावाला व्हॉट्सॲपवर पाठवली होती. पोलिस तपास सुरू असतानाच या प्रकरणाने आता नवा धक्का दिला आहे. तपासादरम्यान पंचवटी पोलिसांनी नेहाच्या सासरी घरझडती घेतली असता, एका भिंतीवर बिब्बा आणि त्यावर नागाच्या आकारामध्ये खिळे लावलेले आढळले आहेत. पोलिसांनी हा संपूर्ण साहित्य ताब्यात घेतले असून, याद्वारे नेहाला जादूटोण्याची भीती दाखवली जात होती का, याचा तपास सुरू आहे.

या नव्या पुराव्यामुळे प्रकरणात अधिकच सस्पेन्स निर्माण झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत अतिरिक्त कलम लावले असून, आतापर्यंत नेहाचा नवरा, सासू आणि तीन नणंद अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून सर्व आरोपींची स्वतंत्ररीत्या चौकशी सुरू आहे.

हेही वाचा: Mumbai Water Supply: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! काही भागात दोन दिवसांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद

दरम्यान, नेहाच्या सुसाईड नोटमधून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. लग्नानंतर नवऱ्याने तिच्यावर अविश्वास व्यक्त करत वैयक्तिक बाबींवर संशय घेतल्याचा, तसेच कुटुंबीयांनी मासिक पाळीच्या नावाखाली तिच्यावर अत्यंत अपमानास्पद पद्धतीने तपासणी केल्याचा आरोप तिने नोंदवला आहे. तिच्या मते, सासरच्यांचे वागणे आणि मानसिक छळ दिवसेंदिवस वाढत होता. सुसाईड नोटमध्ये नेहाने लिहिले आहे की, हुंड्यासारख्या मागण्या, आर्थिक संकट आणि नवऱ्याचे एका युवतीसोबतचे संबंध यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. सासरकडून वारंवार पैशांची मागणी केली जात असल्याने तिच्या माहेरच्यांनी 20 हजार रुपये देऊन मदत केल्याचेही तिने उल्लेख केले आहे. दिवाळीसाठी ती माहेरी गेल्यानंतर दहाच दिवसात तिला परत सासरी बोलावले गेले, त्यानंतर छळ अधिक वाढल्याचे तिने लिहिले.

नेहाने शेवटच्या ओळींमध्ये तिच्या मृत्यूस सासरच्या लोकांना जबाबदार धरले असून, "माझे नशीबच खराब, मला चांगले सासर मिळाले नाही" असे भावनिक शब्द लिहित तिने जीवन संपवले. तिने ही चिठ्ठी सासरच्यांच्या हातात पडू नये म्हणून तिचे फोटो काढून भावाला आणि काही नातेवाईकांना पाठवले होते.

या प्रकरणामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून नेहाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे घडला, जादूटोण्याचा तपास कितपत खरा आहे आणि मानसिक छळाच्या आरोपांमध्ये कोणते पुरावे समोर येतात, याचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे.

हेही वाचा: Shirur Accident: शिरूर हादरलं! आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या गाडीची 4 वर्षीय चिमुकलीला जोरदार धडक; प्रकृती गंभीर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number