गुजरातला जास्त पाणी मिळावं म्हणून नाशिकच्या नदीजोड प्रस्तावात बदल केल्याचा धक्कादायक आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   नाशिकच्या नारपार गिरणा नदी जोड योजनेचा प्रस्ताव बदलल्याचा धक्कादायक बाब उघड झालीय. शिवसेना मंत्री दादा भुसे आणि उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधीनी नारपार गिरणा नदीजोड योजनेसंदर्भात माहिती घेण्यासाठी नाशिकच्या विश्रामगृहावर बैठक बोलावली होती. या बैठकीत या योजनेचा प्रस्ताव बदल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीये.  गुजरातला जास्त पाणी मिळावं म्हणून प्रस्तावात बदल करण्यात आल्याचं आरोप […]

गुजरातला जास्त पाणी मिळावं म्हणून नाशिकच्या नदीजोड प्रस्तावात बदल केल्याचा धक्कादायक आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकच्या नारपार गिरणा नदी जोड योजनेचा प्रस्ताव बदलल्याचा धक्कादायक बाब उघड झालीय. शिवसेना मंत्री दादा भुसे आणि उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधीनी नारपार गिरणा नदीजोड योजनेसंदर्भात माहिती घेण्यासाठी नाशिकच्या विश्रामगृहावर बैठक बोलावली होती.

या बैठकीत या योजनेचा प्रस्ताव बदल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीये.  गुजरातला जास्त पाणी मिळावं म्हणून प्रस्तावात बदल करण्यात आल्याचं आरोप लोकप्रितिनिधींनी केलाय.

या योजनेसंदर्भात जो बदलेल्या प्रस्ताव आहे त्यात  महाराष्ट्राला लागणऱ्या पाण्याची उपलब्धता कमी  दाखवण्यात आलीय. प्रस्ताव बदल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील अनेक तालुके पाण्यापासून वंचीत राहणार आहेत.

नारपार खोऱ्यातून 15 टीमसी पाणी महाराष्ट्राला तर गुजरातला 12 टीमसी पाणी मिळणार आहे नारपार गिरणा नदीजोड योजनेमुळे उत्तर महाराष्ट्रतील अनेक तालुके दुष्काळ मुक्त  होणार होते पण प्रस्ताव बदल्याने अनेक तालुके पाण्यापासून वंचित राहणार आहेत..

या संदर्भात मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यात येणार.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number