नाशिकचा गोदा घाट भाविकांनी फुलला

नाशिक, १६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नाशिकच्या गोदावरी नदीत बुधवारी अधिकमास अमावस्येनिमित्त नदीत स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. देशभरातून हजारो भाविक रामकुंड तीर्थावर स्नान करण्यासाठी येत असल्याने परिसराला कुंभमेळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गुरुवारपासून श्रावण मासाला सुरुवात होत असल्याने या तीर्थ स्नानाला विशेष महत्व आहे. १. बुधवार १६ ऑगस्ट २०२३ : अधिक श्रावण […]

नाशिकचा गोदा घाट भाविकांनी फुलला

नाशिक, १६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नाशिकच्या गोदावरी नदीत बुधवारी अधिकमास अमावस्येनिमित्त नदीत स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. देशभरातून हजारो भाविक रामकुंड तीर्थावर स्नान करण्यासाठी येत असल्याने परिसराला कुंभमेळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गुरुवारपासून श्रावण मासाला सुरुवात होत असल्याने या तीर्थ स्नानाला विशेष महत्व आहे.

१. बुधवार १६ ऑगस्ट २०२३ : अधिक श्रावण अमावस्या, अधिक श्रावण मास समाप्ती : अमावस्या समाप्ती दुपारी ०३ : ०७
२. गुरुवार १७ ऑगस्ट २०२३ : निज श्रावण मासारंभ

श्रावण महिन्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिरात विशेष व्यवस्था

१. श्रावण महिन्यात पहाटे ५ पासून रात्री ९ वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार
२. प्रत्येक श्रावण सोमवारी पहाटे ४ वाजता मंदिर खुले होणार
३. स्थानिकांना मंदिर उघडल्यानंतर सकाळी १० : ३० पर्यंत तर संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान दर्शन घेता येणार
४. स्थानिकांना दर्शनाकरिता येतांना रहिवासी पुरावा दाखवणे बंधनकारक
५. स्थानिकांना उत्तर महाद्वारातून प्रवेश
६. भाविकांच्या सोयीसाठी वातानुकूलित दर्शन बारी
७. जेष्ठ नागरिकांना बसण्याची व्यवस्था
८. स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number