जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
नाशकात निफाड तालुक्यातील गोदावरी नदीवर असलेल्या सायखेडा पुलावरून नागरिकांचा धोकादायक प्रवास सुरू आहे.
पुल कधीही कोसळू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली. नागरिकांना दुसरा पर्याय रस्ता नसून त्यांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय.
दरम्यान बांधकाम विभागानं रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. मात्र, दुरुस्तीचा काम अजून सुरु केले नाही. त्यामुळे पर्यायी रस्ताचं नसल्यानं याच पुलावरून वाहतूक
सुरू आहे.
तसेच याठिकाणाची वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाचा एकही कर्मचारी नसून फक्त बोर्ड लावण्यात आला. सिन्नर, संगमनेर, शिर्डी, पुणे नगर अशा महत्वाच्या गावांना
जोडणारा रस्त्यावर हा पूल आहे.