मुलीला वाचवताना वडीलांनी गमवला जीव…

जय महाराष्ट्र न्युज, नाशिक पाचव्या मजल्यावरून तोल जाऊन मुलगी अंगावर पडल्यानं वडीलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. नाशिकच्या सामनगाव रोडवरील जयप्रकाश नगरमध्ये ही दुर्दैवी घटना घडलीय. रात्री चुलत बहिणीच्या हळदीचा कार्यक्रम पाहत असतांना पाचव्या मजल्यावरून अचानक तोल जाऊन सुनंदा गोधडे ही १६ वर्षांची मुलगी खाली पडली. तिला वाचवण्यासाठी पुढे धावलेल्या वडीलांच्या अंगावर ही मुलगी पडल्यानं वडील […]

मुलीला वाचवताना वडीलांनी गमवला जीव…

जय महाराष्ट्र न्युज, नाशिक

पाचव्या मजल्यावरून तोल जाऊन मुलगी अंगावर पडल्यानं वडीलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. नाशिकच्या सामनगाव रोडवरील जयप्रकाश नगरमध्ये ही दुर्दैवी घटना घडलीय. रात्री चुलत बहिणीच्या हळदीचा कार्यक्रम पाहत असतांना पाचव्या मजल्यावरून अचानक तोल जाऊन सुनंदा गोधडे ही १६ वर्षांची मुलगी खाली पडली. तिला वाचवण्यासाठी पुढे धावलेल्या वडीलांच्या अंगावर ही मुलगी पडल्यानं वडील खाली कोसळले आणि तिथेच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

विजय गोधडे असं मृत वडीलांचं नाव आहे. तर गंभीर जखमी झालेल्या मुलीवर सध्या नाशिकच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number