गाईचे खरवस खाल्ल्याने एकाच कुंटुंबातील 8 जणांना विषबाधा

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक मालेगावमध्ये खालप येथील एकाच कुटुंबातील 8 व्यक्तीनां विषबाधा झाल्याची घटना घडलीय. देवळा तालुक्यातील खालप येथे एकाच कुटुंबातील आठ व्यक्तीनां गाईचे खरवस खाल्ल्याने विषबाधा झाली आहे. यात पाच मुले, दोन महिला व एक पुरुष अशा आठ व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्यावर देवळा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. विषबाधा झालेल्यांमध्ये एका चार वर्षाच्या बालकाचा […]

गाईचे खरवस खाल्ल्याने एकाच कुंटुंबातील 8 जणांना विषबाधा

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

मालेगावमध्ये खालप येथील एकाच कुटुंबातील 8 व्यक्तीनां विषबाधा झाल्याची घटना घडलीय. देवळा तालुक्यातील खालप येथे एकाच कुटुंबातील आठ व्यक्तीनां गाईचे खरवस खाल्ल्याने विषबाधा झाली आहे.

यात पाच मुले, दोन महिला व एक पुरुष अशा आठ व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्यावर देवळा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

विषबाधा झालेल्यांमध्ये एका चार वर्षाच्या बालकाचा समावेश असून सध्या सर्वांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे तेथील आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number