आंघोळ करताना शॉवरमध्ये करंट उतरुन डॉक्टरांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिकमधील एका डॉक्टरचा आंघोळ करताना शॉवरमध्ये करंट उतरुन विद्युत प्रवाहामुळे शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. डॉ. आशिष विलास काकडे असे मृत डॉक्टरचे नाव असून, गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकाजवळ इंद्रप्रस्थ सोसायटीमधील राहिवासी होते. दुपारच्या सुमारास डॉ. आशिष विलास काकडे यांच्या घरातून पाणी बाहेर येत असल्याचं तेथील रहिवाशांच्या लक्षात […]

आंघोळ करताना शॉवरमध्ये करंट उतरुन डॉक्टरांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिकमधील एका डॉक्टरचा आंघोळ करताना शॉवरमध्ये करंट उतरुन विद्युत प्रवाहामुळे शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. डॉ. आशिष विलास काकडे असे मृत डॉक्टरचे नाव असून, गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकाजवळ इंद्रप्रस्थ सोसायटीमधील राहिवासी होते.

दुपारच्या सुमारास डॉ. आशिष विलास काकडे यांच्या घरातून पाणी बाहेर येत असल्याचं तेथील रहिवाशांच्या लक्षात आलं. त्यांनी घरात जाऊन बघितले असता, डॉ. काकडे बाथरुममध्ये मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी तात्काळ सरकारवाडा पोलिसांना याबाबत माहिती दिली.

डॉ. काकडे यांच्या अंगावर भाजल्याचे डाग आढळून आले होते. मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. शॉक लागून मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात उघड झालं.

डॉ.आशिष विलास काकडे हे नाशिकच्या मोतिवाला महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत होते. मूळचे ते तळोदा येथील असून, तळोद्याला त्यांचे आई वडील दोघेही डॉक्टर आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number