नाशिक जिल्हा उपनिबंधक एसीबीच्या जाळ्यात

नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधकास तीस लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील लाखाे सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासह आवश्यक परवानग्या आणि निवडणुका लावणाऱ्या जिल्हा उपनिबंधक सतिष खरे यांना 30 लाख रुपयांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. खरे यांनी ही लाच स्वीकारली […]

नाशिक जिल्हा उपनिबंधक एसीबीच्या जाळ्यात

नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधकास तीस लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील लाखाे सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासह आवश्यक परवानग्या आणि निवडणुका लावणाऱ्या जिल्हा उपनिबंधक सतिष खरे यांना 30 लाख रुपयांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. खरे यांनी ही लाच स्वीकारली असून सतिश खरेंसोबत वकील शैलेश सभद्रा यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

यातील तक्रारदार हे नुकतेच नाशिक जिल्ह्यातील एका कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये संचालकपदी कायदेशीर पद्धतीने आणि वैधपणे म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या निवडी विरुद्ध दाखल झालेल्या प्रकरणावरवर सुनावणी घेऊन ती सुनावणी तक्रारदार यांच्या बाजूने लावून निर्णय देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक खरे आणि त्यांच्या एका वकिलाने तक्रारदार यांच्याकडे तीस लाख रुपये लाचेची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारताना दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेतल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी दिली.

१५ मे रोजी रात्री उशिरा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. संबंधित कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहालदे, उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, सुखदेव मुरकुटे, मनोज पाटील, अजय गरुड यांनी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number