जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
नाशिक शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. संततधार पावसामुळे शहरात साचलेल्या पाण्याने अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या.
यातच नाला ओलांडत असताना पाण्यात बुडालेल्या युवकाचा मृतदेह शोधण्यास अग्निशामक दलाला यश आले.
गणेश मोरे असं या मृत युवकाच नाव आहे. नाल्यात वाहून गेलेल्या गणेशचा मृतदेह गोदावरी नदीच्या पात्रात सापडला.
पाण्याचा अंदाज न आल्याने गणेश नाल्यात पडला. पाण्याचा प्रवाहाचा वेग वाढता असल्यामुळे गणेश स्वत:चा तोल सावरू शकला नाही.
रस्त्याने जाणाऱ्या एका महिलेने हा प्रकार पाहिल्या नंतर तातडीने अग्निशामक दलाला माहिती दिली.
त्यानंतर मुलाचा शोध सुरु झाला. अखेर गणेशचा मृतदेह शोधण्यास अग्निशामक दलाला यश आले.