नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये लाखोंचा गुटखा जप्त

सिन्नर, १६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पिंपरवाडी येथील टोलनाक्यावर ३१ लाख रुपयांचा बंदी घातलेला गुटखा जप्त करण्यात आला. अमरावती येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकमध्ये हा गुटखा आढळला. ट्रकची तपासणी सुरू असताना मागून एक इनोव्हा आली. या इनोव्हातून आलेल्या ३ जणांनी पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. सखोल तपासणीत ट्रकमध्ये बंदी […]

नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये लाखोंचा गुटखा जप्त

सिन्नर, १६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पिंपरवाडी येथील टोलनाक्यावर ३१ लाख रुपयांचा बंदी घातलेला गुटखा जप्त करण्यात आला. अमरावती येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकमध्ये हा गुटखा आढळला. ट्रकची तपासणी सुरू असताना मागून एक इनोव्हा आली. या इनोव्हातून आलेल्या ३ जणांनी पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. सखोल तपासणीत ट्रकमध्ये बंदी घातलेल्या गुटख्याचा ३० लाख ७८ हजार रुपयांचा साठा आढळला.

जप्त केलेल्या गुटख्याप्रकरणी सलीम खान अफसर खान (३५ । रा. अलीमनगर, अमरावती), अहमद खान रेहमद खान (३५ । रा. ताजनगर अमरावती), समीर खान अफसर खान (३३ । रा. अमरावती अलीमनगर, अमरावती), शेख रेहमान शेख रहीम (३१ । रा. मुजफरपुरा, अमरावती), अरिफ खान दिलावर खान (३६ । रा. ताजनगर अमरावती) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number