जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
साहेब आमच्या घरी या” असे सूर कानी पडताच भरधाव वेगाने निघालेला मुख्यमंत्र्यचा ताफा एकदम थांबतो, आणि साऱ्या यंत्रणेचीच तारांबळ उडते. हे घडलं आहे नाशिकच्या त्रंबकेश्वर रस्त्यावर.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशिक दौऱ्यावर होते, त्यांच्या नियोजित कार्यक्रम दरम्यान त्रंबकेश्वर रस्त्यावर उभ्या असलेल्या आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांची मुलं सकाळपासून त्यांची वाट बघत होती.
मात्र, ही भेट नियोजनात नसल्यानं मुख्यमंत्र्यांचा ताफा भरधाव वेगाने पुढे निघाला. मात्र, या चिमुरड्यांची हाक कानावर पडताच मुख्यमंत्र्यनी ताफा थांबवत गाडी पुन्हा माघारी घेतली. या घटनेने काही वेळ सगळ्या यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली.