जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
नागपूर महापालिकेची आपली बससेवा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत. शहरातील यशवंत स्टेडियमजवळील डेपोमधून पोलिसांच्या बंदोबस्तात बस बाहेर काढल्या जात आहेत. भारतीय कामगार सेनेनं संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच मेस्माविरोधात कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं आहे.
नागपूर महापालिकेतील बस सेवक, चालक आणि वाहक मंगळवारपासून संपावर आहेत. त्यामुळे नागपूरकरांना मंगळवारपासून नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. काल मेस्मा लागू झाल्यानंतर अनेक चालक आणि वाहक संपावर ठाम आहेत.
दरम्यान पोलिसांनी बस सेवेत आडकाठी करणाऱ्या आणि संपावर ठाम असलेल्या संघटनेच्या नेत्यांना ताब्यात घेण्याच काम सुरु केलं आहे. ऐन वेळी सुरू झालेल्या संपामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचे आज सकाळी हाल झाले. मंगळवारपासून बारावीची परीक्षा सुरु झाली आहे. त्यात बस सेवा बंद असल्याने नागपूरकरांना कालपासून त्रास करावा लागला.