शेळीने दिला आठ पायांच्या पिल्लाला जन्म !

वृत्तसंस्था, छत्तीसगड   छत्तीसगडमधील बलरामपूर येथे एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. एका शेळीने छोट्या शेळीला (करडू) जन्म दिला आहे. मात्र, हे करडू सर्वसामान्य नाही. शेळीने चक्क आठ पाय असलेल्या पिल्लाला जन्म दिला आहे. या घटनेमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.   इतर प्राण्यांमध्येही खूपच अपवादात्मक अशा घटना पहायला मिळतात. छत्तीसगढमधील बलरामपूरच्या कर्वशिला गावात ही […]

शेळीने दिला आठ पायांच्या पिल्लाला जन्म !

वृत्तसंस्था, छत्तीसगड

 

छत्तीसगडमधील बलरामपूर येथे एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. एका शेळीने छोट्या शेळीला (करडू) जन्म दिला आहे. मात्र, हे करडू सर्वसामान्य नाही. शेळीने चक्क आठ पाय असलेल्या पिल्लाला जन्म दिला आहे. या घटनेमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

 

इतर प्राण्यांमध्येही खूपच अपवादात्मक अशा घटना पहायला मिळतात. छत्तीसगढमधील बलरामपूरच्या कर्वशिला गावात ही घटना घडली आहे. हे शेळीचे करडू पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोक येथे गर्दी करीत आहेत. काही लोक याला निसर्गाचा चमत्कारही मानत आहेत. विशेष म्हणजे या करडाची प्रकृती चांगली आहे.

 

प्राण्यांच्या बाळाचा जन्म होण्यापूर्वी त्यांच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये जैविक बदल झाल्याने अशा घटना घडतात. प्रामुख्याने प्राण्यांमध्ये हा प्रकार आढळतो. सयामी जुळ्यांमध्ये अनेकदा एका धडावर दोन डोकी किंवा कमरेखालील भाग एक अशा बाळांनी जन्म घेतलेल्या घटना अधून-मधून ऐकायला मिळतात.

 

मात्र, पशुवैद्यकीय डॉक्टरांनी हा कुठलाही चमत्कार नसून दोष असल्याचे म्हटले आहे. अपवादात्मक स्थितीत गर्भधारणेच्या प्रक्रियेदरम्यान जैविक बदल घडून आल्याने असे प्रकार घडण्याची शक्यता असते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number