जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
अत्याधुनिक सुविधा असलेली आश्रम शाळा 9 एकर परिसरात तयार करण्यात आली पण तीन वर्षात येथे विदयार्थी नसल्याने आदिवासी विभागाला येथे कुलूप लावण्याची नामुष्की आली आहे. मुला-मुलींसाठी 60-60 खोल्यांचे स्वतंत्र कॅम्पस, शिक्षकांसाठी स्वतंत्र निवासी संकुलं, अत्याधुनिक पद्धतीचे स्वयंपाक गृह, सोलर सिस्टीम वर पाणीपुरवठा व्यवस्था, खेळाचे मैदान, वाचनालय नागपूर शहरात शोधूनही सापडणार नाही असा या आश्रमशाळेचा कॅम्पस आहे. पण आता या शाळेत एकही विध्यार्थी नाही.
भविष्यात या वास्तूचा नव्याने उपयोग हवा येथे तांत्रिक शिक्षक किंवा आदिवासी साठी कुटीर उदयोग प्रशिक्षक केंद्र किंवा एखादे रुग्णालय या साठी या इमारतीचा उपयोग व्हावा अशी मागणी येथील पालकांनी केली आहे . तर आदिवासी विभागाने यावर विचार करणार असल्याचे सांगितले.
1981मध्ये या आश्रमशाळेला सुरवात झाली. जुन्या इमारतीत विदयार्थी मावत नसल्याने 2014 मध्ये ही नवी वास्तूं उभारण्यात आली. त्यासाठी 20 कोटी खर्च करण्यात आले. आज ही शोभेची वस्तू बनली आहे. या शाळेतील आधुनिक उपकरनांवर चोरट्यांनी नजर आहे. त्यामुळे शासनाच्या पैशाचा चुराडा कोणी केला ? कोणाच्या चुकीने आश्रम शाळा बंद पडली? हे प्रश्न या भागातील पालकांनी केले आहे.