जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
नाशिक जिल्हा बॅंकेची दादागिरी सुरुच आहे. पैसे काढण्यासाठी आलेल्या अपंग मुख्याध्यापकाला बँकेतील कर्मचाऱ्यांनी दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार नाशकात समोर आला आहे.
कर्मचाऱ्यांनी दमदाटी केल्याने अपंग मुख्याध्यापकांनी जिल्हा बॅंकेत गोंधळ घातला. मुलीच्या शिक्षणासाठी या अपंग मुख्याध्यपकाला फंडातले पैसे लागत होते.
पण, जिल्हा बँकेच्या अनागोंदी कारभारामुळे बँकेने दिलेले चेक दोनदा झाले बाऊंस झाल्यामुळे या मुख्याध्यापकाला काहीचं पर्याय उरला नाही.