नार्वेकर ५ दिवस लंडन दौऱ्यावर

सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या काही दिवसांतच येण्याची शक्यता आहे… असं असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ५ दिवसांच्या लंडन दौऱ्यावर. ९ मे ते १५ मेपर्यंत विधानसभा अध्यक्षांचा लंडन दौरा. ९ मे रोजी रात्री लंडनला निघणार, तर १५ मे रोजी परत येणार. राष्ट्रकूल मंडळांचे आंतराष्ट्रीय शिबीर मुंबईत करण्यासाठी प्राथमिक चर्चा करणार. सत्तासंघर्षावर सर्वोच्य न्यायालयात निकाल अपेक्षित असताना अध्यक्षांच्या […]

नार्वेकर ५ दिवस लंडन दौऱ्यावर

सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या काही दिवसांतच येण्याची शक्यता आहे… असं असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ५ दिवसांच्या लंडन दौऱ्यावर. ९ मे ते १५ मेपर्यंत विधानसभा अध्यक्षांचा लंडन दौरा. ९ मे रोजी रात्री लंडनला निघणार, तर १५ मे रोजी परत येणार. राष्ट्रकूल मंडळांचे आंतराष्ट्रीय शिबीर मुंबईत करण्यासाठी प्राथमिक चर्चा करणार. सत्तासंघर्षावर सर्वोच्य न्यायालयात निकाल अपेक्षित असताना अध्यक्षांच्या लंडन दौऱ्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

राहुल नार्वेकर हे ९ मेला लंडन दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. नार्वेकर हे १५ दिवसांसाठी लंडनला जाणार आहेत. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकडीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची चर्चा असताना नार्वेकर दौऱ्यावर जाणार असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे राज्यातील प्रकरणाची सुनावणी झाली. सूनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखीव ठेवला आहे. न्यायमूर्ती शाह हे १५ मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे मंगळवार ते शुक्रवार या दरम्यान घटनापीठ निकाल देण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number