Bhiwandi Crime News : चिमुकलीला खाऊचे आमिष देत 18 वर्षाच्या नराधमाचा अत्याचार; नागारिकांमध्ये संतापाची लाट

भिवंडी : राज्यात अल्पवयीन चिमुरडींवर अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच गुरुवार, 25 जून रोजी दुपारी भिवंडी तालुक्यातील कशेळी येथे इमारती खाली खेळणाऱ्या सात वर्षीय चिमुरडीवर खाऊचे आमिष दाखवून फ्लॅटमध्ये नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच अवघ्या दोन तासात फरार होण्याच्या तयारीत असलेल्या 18 वर्षीय आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.  हेही वाचा : Ketan […]

Bhiwandi Crime News : चिमुकलीला खाऊचे आमिष देत 18 वर्षाच्या नराधमाचा अत्याचार; नागारिकांमध्ये संतापाची लाट

भिवंडी : राज्यात अल्पवयीन चिमुरडींवर अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच गुरुवार, 25 जून रोजी दुपारी भिवंडी तालुक्यातील कशेळी येथे इमारती खाली खेळणाऱ्या सात वर्षीय चिमुरडीवर खाऊचे आमिष दाखवून फ्लॅटमध्ये नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच अवघ्या दोन तासात फरार होण्याच्या तयारीत असलेल्या 18 वर्षीय आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 

हेही वाचा : Ketan Agarwal Murder Case : "तिलाही तसंच खाली ढकला, एक वडील म्हणून मी सांगेन" केतनला जीवे मारणाऱ्या सियाविरोधात आई-वडिलांनी केली मोठी मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कशेळी येथील एका इमारतीमध्ये राहणारी सात वर्षीय चिमुरडी आपल्या दहा वर्षीय भावासोबत इमारती खाली खेळत होती. त्यावेळी नराधम त्या ठिकाणी आला, त्याने या दोघांना खाऊचे आमिष दाखवत भावाकडे 50 रुपये पाणी आणण्यासाठी दिले. पुढे चिमुरडीला त्यांच्या इमारतीपासून तीन ते चार बिल्डिंग लांब आपल्या भाड्याच्या खोलीत घेऊन गेला. तेथे तिचे हात बांधून तोंड दाबून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. घरी परतल्यावर सायंकाळी चिमुरडीने ही बाब घरच्यांना सांगितली. त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात सायंकाळी सात वाजता गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने संशयित आरोपीचा शोध सुरू केली. अवघ्या दोन तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेनंतर कशेळी परिसरात संतापाची लाट उसळली असून त्यांनी रात्री उशिरा पोलीस ठाण्याबाहेर जमत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number