लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभा घेत आहेत. दिल्ली येथील रामलीला मैदानावर घेतलेल्या सभेत बोलताना मोदींनी पुन्हा एकदा माजी पंतप्रधान राजीव गांधींवर घणाघाती टीका केली आहे. राजीव गांधींनी विराट युद्धनौकेचा वापर आपल्या कुटुंबासह सहलीला जाण्यासाठी केला असल्याचे गंभीर आरोप मोदींनी लावला आहे. यापूर्वी सुद्धा मोदींनी राजीव गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राजकीय नेत्यांसह नागरिक संतप्त झाले.
दिल्ली येथील रामलीला मैदानावर आोयजित केलेल्या सभेत कॉंग्रेसवर घणाघात केला.
राजीव गांधी पंतप्रधान असताना कुटुंबासोबत सहलीला जाण्यासाठी विराट युद्धनौकेचा वापर केला असा गंभीर आरोप मोदींनी लावला आहे.
आयएनएस विराट युद्धनौकेचा वापर व्यक्तिगत टॅक्सीसारखा केला असल्याचे म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींनी यापूर्वी सुद्धा राजीव गांधींविरोधात हल्लाबोल चढवला होता.
तुमचे वडिल राजीव गांधी मिस्टर यांची ओळख मिस्टर क्लिन म्हणून होती.
मात्र मिस्टर क्लिनचा कार्यकाळ हा भ्रष्टाचारी नंबर 1 म्हणून संपल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
मोदींच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
तसेच त्यांच्यावर प्रचंड टीकाही करण्यात आली होती.
राजकीय नेत्यांसह अनेक नागरिकही संतप्त झाले.