पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर पुढील सुनावणी 2 मे रोजी होणार आहे. तसेच न्यायालयाने निवडणूक आयोगालाही नोटीस बजावली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला तोपर्यंत निर्णय घेण्यास परवानगी दिली असल्याचे म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अचारसंहिता भंग केली नसून त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात आचारसंहित भंग केल्याची याचिका दाखल करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर 2 मे रोजी सुनावणी देणार असल्याचे म्हटलं होतं.
मात्र तोपर्यंत काही निर्णय घेण्यास निवडणूक आयोगाला परवानगी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणूक आयोगाने क्लीन चिट दिले आहे.
लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात या दोन्ही नेत्यांनी आचारसंहिता भंग केले असल्याचे 146 पानांच्या याचिकेत म्हटलं आहे.
कॉंग्रेस खासदार सुष्मिता देव यांनी ही याचिका दाखल केली.