जय महाराष्ट्र न्यूज, रायगड
नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत तरीदेखील त्यांचे मारेकरी सापडले नाहीत. याच्या निषेधार्थ आज अलिबाग येथे
अंनिसच्या वतीने ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले.
आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात
आली.
दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी असे निवेदन यावेळी अंनिसचे प्रदेश
महासचिव नितीन राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवले.