जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नारायण राणे यांनी काँग्रेसला रामराम करत आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्या पार्श्वभुमिवर काँग्रेस प्रदेश प्रवक्ते राजू वाघमारे यांनी नांदेडमध्ये बोलतांना प्रतिक्रीया दिली.
राणेंमुळे काँग्रेसला कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही. काँग्रेस पक्ष हा विशिष्ट विचारधारेचा आहे. त्यामुळे कुणाच्या जाण्याने पक्षाला काहीच फरक नाही असं राजू वाघमारे म्हणाले.
राणेंच्या राजीनाम्याने फरक पडलाच तर तो कोकणातील फारफार तर एखाद-दोन मतदार संघांना पडेल अशी प्रतिक्रीया नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलतांना त्यांनी दिली.