जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर शिवसेनेने आक्षेप नोंदवला होता. मात्र, शिवसेनेला नारायण राणे यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलंय.
भाजपाने मला उमेदवारी दिली आता शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडून दाखवावं, असे थेट आव्हान नारायण राणे यांनी शिवसेनेला दिलंय.
याशिवाय नारायण राणे हे भाजपाच्या तिकीटावर राज्यसभेवर निवडून जाणार असल्याने राणे यांना आपल्याच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलाय.