जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्यात सत्ताधारी आणि विरोधक केवळ आरोप-प्रत्यारोप करतायंत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणी काहीचं करत नाही, अशी टीका स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी केलीय.
तर, शिवसेनेची पक्षाते येण्याची ऑफर होती आणि ती नाकारल्याची माहिती देखील नारायण राणेंनी दिलीय. शिवसेनाही सत्तेत राहून विरोधात बोलतंय.
कर्जमाफीवरून सत्तेवर लाथ मारण्याचा इशारा 50 वेळा दिला. पण, सत्तेत चिकटून राहणे हे शिवसेनेचे वैशिष्ट्य असल्याचा टोलाही नारायण राणेंनी लगावलाय.
तर, भाजपाला एखाद्या जोतिष्यांने सल्ला दिला असेल त्यामुळे उमेदवारी मिळाली नाही. भाजपात ज्योतिष जास्त असतील असा टोला भाजपला लगावलाय.