जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग
कोकणात काँग्रेसचे राजकारण ढवळून निघालंय असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. नूतन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विकास सावंत यांच्या नियुक्तीनंतर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी कोकणतील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील रणनिती ठरवीन असा सूचक इशारा दिला आहे.
यावेळी राणे यांनी काँग्रेस नेत्यांच्या कुटनीतीचा निषेध करताना विकास सावंत यांच्या नियुक्तीबाबात आपल्याशी कोणतीही चर्चा केली नसल्याचे सांगितले.
‘मी काँग्रेसचा ज्येष्ठ नेता आहे. कोकणात संघटनात्मक, पक्षाचा कोणताही निर्णय घेताना माझ्याशी विचारणा व्हायची.
मात्र, यावेळी कार्यकारणी रद्द करण्याबाबत मला विचारणा झाली नाही,’ असा गौप्यस्फोट राणे यांनी केला.
अशोक चव्हाण आणि मोहन प्रकाश यांनी हे षडयंत्र केल्याचा आरोपही नारायण राणे यांनी यावेळी केला.