नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत वेगळाच ट्विस्ट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   काँग्रेसमधून बाहेर पडलेले नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा जोर धरु लागलेल्या असतानाच आता वेगळा ट्विस्ट आला आहे.   राणेंनी नवा पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या असून येत्या 1 ऑक्टोबरला ते यासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे.   सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण राणे स्वतंत्र पक्ष स्थापन करणार आहेत.   येत्या […]

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत वेगळाच ट्विस्ट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

काँग्रेसमधून बाहेर पडलेले नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा जोर धरु लागलेल्या असतानाच आता वेगळा ट्विस्ट आला आहे.

 

राणेंनी नवा पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या असून येत्या 1 ऑक्टोबरला ते यासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण राणे स्वतंत्र पक्ष स्थापन करणार आहेत.

 

येत्या 1 ऑक्टोबरला राणे पत्रकार परिषद घेऊन नव्या पक्षाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

 

एकीकडे नारायण राणेंचं भाजपशी चर्चेची गुऱ्हाळ सुरु आहे. त्यामुळे राणेंचा नवा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number