जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
रक्षाबंधनासह कोळी बांधवांमध्ये उत्साह असतो तो नारळीपौर्णिमेचा. महाराष्ट्राला विस्तृत समुद्रकिनारा लाभल्यानं नारळीपौर्णिमेचं विशेष महत्त्व आहे.
समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण केला जातो आणि समुद्राची पूजा केली जाते.
या सोन्याच्या नारळाची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. नारळीपौर्णिमेच्या पुजेनंतर कोळी बांधव आपल्या होड्या समुद्रात सोडतात आणि मासेमारीला सुरुवात
करतात.