आज गोकुळाष्टमीचा सुंदर दिवस म्हणजेच सणांची सुरुवात झाली की यानिमित्त प्रत्येकजण आपल्या घरी काही गोड पदार्थ बनवण्याचा बेत आखतात, तुमचा हा बेत परिपूर्ण करण्यासाठी तुमच्यासाठी एक गोड आणि स्वादिष्ट अशी नारळ आणि टरबूजच्या बियांची बर्फी जी तुमच्या सणांचा गोडवा आणखी वाढवेल तर ही स्वादिष्ट बर्फी तुम्ही तुमच्या घरीही नक्की करून पाहा. साहित्य:- सुकं खोबरं – ½ कप […]
आज गोकुळाष्टमीचा सुंदर दिवस म्हणजेच सणांची सुरुवात झाली की यानिमित्त प्रत्येकजण आपल्या घरी काही गोड पदार्थ बनवण्याचा बेत आखतात, तुमचा हा बेत परिपूर्ण करण्यासाठी तुमच्यासाठी एक गोड आणि स्वादिष्ट अशी नारळ आणि टरबूजच्या बियांची बर्फी जी तुमच्या सणांचा गोडवा आणखी वाढवेल तर ही स्वादिष्ट बर्फी तुम्ही तुमच्या घरीही नक्की करून पाहा.
साहित्य:-
सुकं खोबरं – ½ कप
टरबूजच्या बिया – ½ कप
साखर – 2 कप
पाणी 1 कप
कृती :-
प्रथम कढई गॅसवर वर ठेवा. नंतर त्यामध्ये नारळाचा खिस घाला. ते सर्व मिश्रण लालसर होईपर्यंत भाजून घेणे.
त्यानंतर ते मिश्रण कढईतून काढून घ्या.
आता त्यामध्ये टरबूजच्या बिया टाकून त्या भाजून घ्या.
नंतर कढईत पाणी आणि साखर घाला. त्यानंतर 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर तसेच ठेवून. त्याचा पाक तयार करा.
त्या पाकामध्ये भाजलेले खोबरं आणि टरबूजच्या बिया त्यामध्ये टाकून ते मिश्रण 3 ते 4 मिनिटे चांगले शिजवून घेणे.
त्यानंतर एका प्लेटला तूप लावून घ्यावे. आणि ते सर्व मिश्रण प्लेटमध्ये पलटून घ्यावे. ते प्लेटमध्ये पसरून घ्यावे.
थंड झाल्यानंतर त्याचे बारीक कापा करा. आशाप्रकारे आपली नारळ आणि टरबूजच्या बियांची बर्फी तयार.