जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड
नांदेडला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. दरम्यान यावेळी वीज कोसळून पाच महिलांचा मृत्यू झाला.
उमरी तालुक्यातील कारला माळ परिसरातली घटना आहे. पेरणीपूर्व मशागतीच्या दरम्यान शेतातील कचरा वेचण्यास सादर महिला गेल्या होत्या.
पाऊस सुरु झाल्याने झाडाखाली आसरा घेण्यासाठी थांबल्या होत्या. या घटनेमुळे कारला गावासह उमरी तालुक्यावर शोककळा पसरली.