जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड
नांदेड पोलिसांनी 6 अट्टल चोरट्यांना अटक केली आहे. या चोरांकडून पोलिसांनी 19 मोटारसायकलींसह एक चोरीची जीप जप्त केली आहे.
तसेच या चोरांकडून पोलिसांनी 17 लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे. नांदेड लातूर परिसरात या दरोडेखोरांचं मोठं रॅकेट कार्यरत होते.
या टोळीची नांदेड परिसरात मोठी दहशत पसरली होती. आज अखेर पोलिसांना या टोळीतल्या काही आरोपींना पकडण्यात यश आले आहे.